अँड. निता कविटकर:
सौ.निलम राणे, दीपक केसरकरांची प्रमुख उपस्थिती..
⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या वतीने महिला मेळावा सावंतवाडीत आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा उद्या दोन मे रोजी दुपारी ३.३० वा. वैश्यभवन सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. सुमारे एक हजारहुन अधिक महिला याप्रसंगी उपस्थित राहणार असून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सौभाग्यवती निलम राणे व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यावेळी महिलांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा अँड. निता कविटकर यांनी दिली.
लोकसभा मतदारसंघात महिलांची संख्या जास्त असून महिला दीड लाखांहून अधिकच मताधिक्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामागे उभं करणारं असल्याचा विश्वास अँड. निता कविटकर यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, भाई देऊलकर, एकनाथ नारोजी आदी उपस्थित होते.
