हुमरमळा वालावल गावातून नव्वद टक्के मतदान देणार…

ग्रामस्थांचा निर्धार ; रामेश्वर चरणी श्रीफळ ठेऊन प्रचाराला सुरवात..

⚡कुडाळ ता.३०-: हुमरमळा-वालावल गावात खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून विकासकामे १०० टक्के झाली असून शिवसेना उमेदवार खासदार विनायक राऊत यांना ९० टक्के मताधिक्य देण्याचा हुमरमळावासियांनी निर्धार केला आहे.
शिवसेना उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ मंगळवारी श्री देव रामेश्वर चरणीं श्रीफळ ठेऊन शुभारंभ मुख्य गावकर महेश परब, सरपंच अमृत देसाई, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांनी मंजूर करुन मोबाईल टॉवरची गैरसोय दूर केली असून सध्या नवीन ग्रामपंचायत इमारत सुसज्ज होत आहे. ती सुध्दा खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, यांनी दिलेल्या निधीमुळे सध्या हुमरमळा देसाईवाडा पुलाचे काम, बिजोळेवाडी रस्ता, बिजोळेवाडी पूल ही कामे सुरू करण्यात आली असून आचारसंहिता संपल्यावर प्रा. शाळा रामेश्वर विद्या मंदिर नवीन इमारत सुरू करण्यात येईल. गावात जी कामे आजपर्यंत झाली ती अतुल बंगे, अर्चना बंगे यांच्या मागणीनुसार आणि युवासेना वालावल पंचायत समिती विभाग प्रमुख मितेश वालावलकर यांच्या सततच्या प्रयत्नाने खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करुन दिली असून हुमरमळा-वालावल वासियांनी या कामाची पोचपावती म्हणून कायमच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या खंबीर पाठीशी राहिले आहेत. त्यामुळेच हुमरमळा- वालावल गावातील ९० टक्के मताधिक्य खासदार विनायक राऊत यांना देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. हुमरमळा वालावल ग्रामपंचायत सरपंच अमृत देसाई, उपसरपंच रश्मी वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या हेमांगी कंद्रेकर, संजना गुंजकर, मितेश वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली लोकांची कामे सुरळीत होत असल्याने ग्रामस्थ समाधानी आहेत.
यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे, माजी सरपंच अर्चना बंगे, शिवसेनेचे प्रकाश परब, नारायण राणे, महेश परब, सतिश मांजरेकर, वैभव मांजरेकर, कुडाळ शिवसेना महिला उपशहरप्रमुख दुर्वा गवाणकर, शाखाप्रमुख रमेश परब, युवासेना शाखाप्रमुख संदेश जाधव, माजी उपसरपंच स्नेहल सामंत, माजी ग्रामपंचायत सदस्य भिवा गुंजकर, भाऊ गुंजकर, मयुर प्रभु, संदीप प्रभु, रमा गाळवणकर, संजना गुंजकर, दीपक चव्हाण, निकिता वालावलकर, रश्मी रमेश परब, हेमलता परब, राजन कंद्रेकर, हेमंत कंद्रेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page