⚡सावंतवाडी ता.३०-: खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराने वेग घेतला असून महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. त्यांनी सावंतवाडी शहरात प्रभाक निहाय प्रचार सुरू ठेवला आहे.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पदाधिकारी एकत्रितपणे खासदार विनायक राऊत यांचा घरोघरी प्रचार करीत आहेत.
यावेळी राघवेंद्र नार्वेकर सावंतवाडीकॉग्रेस शहर अध्यक्ष समीर वंजारी जिल्हा कॉग्रेस युवानेते शैलेश गवंड ळकर शहरप्रमुख सावंतवाडी श्रृतिका दळवी शहर महिला अध्यक्ष बाबला दुभाषी राष्ट्रवादी कॉग्रेस,उदय राणे शाखा प्रमुख,राजा वाडकर शाखा प्रमुख.आदी उपस्थित होते
