दिपक केसरकर ; आम्ही विकासासाठी सक्षम…
⚡सावंतवाडी ता.२४-: विनायक राऊत यांनी आता राजकारणातून निवृत्ती घेऊन आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवावा, माझ्यासह नारायण राणे व मंत्री उदय सामंत कोकणाच्या विकासासाठी सक्षम आहोत,असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे लगावला.दरम्यान मतदारसंघात विकास कामे कोणी केलीत ही जनतेला ठाऊक आहेत त्यामुळे विनायक राऊतांनी किती जरी लोकांची दिशाभूल केली तरी जनता सुज्ञ आहे असेही केसरकर यावेळी म्हणाले.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषेदत बोलत होते.