हनुमान जन्मोत्सवानिमित्त कालवी येथे २३ रोजी रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन…

⚡देवगड ता.२१-: देवगड तालुक्यातील कालवीवाडी तरुणोत्साही ग्रामस्थ मंडळ कालवी, कालवी वाडी युवक मंडळ मुंबई यांच्या वतीने जिल्हा रक्तपेढी ओरोस यांच्या सहकार्याने सलग तिसऱ्या वर्षी मंगळवार दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.

तरी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहकार्य करावे, तसेच मोफत आरोग्या तपासणी आपण सर्वांनी सहकुटुंब या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा .तसेच रात्री हनुमान जयंती निमित्त रात्री दहा वाजता स्थानिक मुलांचे रेकॉर्ड डान्स स्पर्धाचे आयोजन केले आहे.असे आवाहन कालवीवाडी तरुणोत्साही ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page