कष्ट करा, तरच यशस्वी व्हाल…

भाई मंत्री:इंग्लिश मिडियमचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न..

⚡वेंगुर्ला ता.०३-: कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला जर आयुष्यात पुढे जायचे असेल तर आतापासून कष्ट करा तरच आयुष्यात यशस्वी व्हाल असा संदेश सामाजिक कार्यकर्ते रघुवीर तथा भाई मंत्री यांनी विद्यार्थ्यांना दिला.

  येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियमचा वार्षिक पारितोषिक वितरण २९ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाई मंत्री,  राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, वेताळ प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ.सचिन परूळकर, बॅ.खर्डेकर कॉलेजचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, माजी प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, मुख्याध्यापक मिताली होडावडेकर, विद्यार्थी प्रतिनिधी चिन्मय पेडणेकर, निधी पालकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळेतील तसेच शाळाबाह्य स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भाई मंत्री यांनी शाळेला ५१ हजार रूपयांची देणगी दिली. सूत्रसंचालन धनश्री तुळसकर, प्रास्ताविक सोनल जोशी, बक्षिसांचे वाचन ममता वैद्य व आभार पांडुरंग मिशाळ यांनी केले.
You cannot copy content of this page