मोदी सरकारला जागे करण्यासाठी पक्षाध्यक्षाचे आदेश;जिल्हाध्यक्ष गावडे यांची माहिती
*💫सावंतवाडी दि.२१-:* केंद्र सरकारने लागू केलेले तीन काळे कृषी कायदे तसेच वाढलेली महागाई या मुद्द्यावर मोदी सरकारला जागे करण्यासाठी २६ मार्च रोजी शेतकरी संघटनानी भारत बंद पुकारला असून, या बंदला राष्ट्रीय कॉंग्रेसने सक्रिय पाठिंबा दिला असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी उपोषण करण्याचे आदेश सर्व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार २४ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सकाळी ११ ते ४ या वेळेत तालुक्यातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते याना घेऊन तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचा सूचना सिंधुदुर्ग कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे यांनी दिल्या आहेत.
