अर्चना घारे परब:संघटना जर आपल्या पाठीशी उभी असेल तर आपण जगही जिंकू शकतो..
⚡सावंतवाडी ता.०७-: कोकणातील मंडळी आलेल्या पाहुण्यांचे पाहुणचार करायला कुठेही कमी पडत नाही त्यामुळे 36 जिल्ह्यातून आलेले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नक्कीच आमची सर्व मंडळी करतील व आज सावंतवाडीत ठेवण्यात आलेलं शिक्षक अधिवेशन यशस्वीपणे हे अधिवेशन पार पाडतील, असा विश्वास सौ.अर्चना घारे परब यांनी आज येथे व्यक्त केला.दरम्यान शिक्षकांच योगदान हे प्रत्येक क्षेत्रात खूप मोठ आहे तुमचं रूण कोणच फेडू शकत नाही असे देखील घारे परब यांनी यावेळी सांगितले. ते सावंतवाडीत आज राज्य माध्यमिक शिक्षकेतर संघटनेने आज सावंतवाडीत अधिवेशनात आयोजन केले होते यावेळी सौ.घारे परब बोलत होत्या. यावेळी सौ अर्चना घारे परब यांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अर्चना घारे परब बोलताना म्हणाले की आज सर्व शिक्षक एका अधिवेशनानिमित्त एकत्र आलात हे खरच कौतुकास्पद बात आहे परंतु एखादी आपल्या काम मार्गी लागायचं असतं तर त्याला संघटना जर पाठबळ असला तर आपण जो काही जिंकू शकतो असे प्रतिपादन देखील सौ.परब यांनी यावेळी केले. आज महाराष्ट्रातील विद्यार्थी देशभर व परदेशात देखील नोकऱ्यांसाठी जातात त्याच्या मागे या तुमच्यासारख्या शिक्षकांचा हात असल्यानेच व तुमच्यासारखे एक चांगलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देणारेच शिक्षक असतात त्यामुळे तुमच्या हातून असेच विद्यार्थी घडवून आपल्या देशाचं नाव उंचवण्याचं काम त्यांच्याकडून व्हावे अशी अपेक्षा देखील सौ.परब यांनी यावेळी व्यक्त केल्या
