⚡सावंतवाडी ता.२१-: येथील बाहेरचावाडा बुराण गल्ली परिसरातील सकील बुराण यांच्या घरासमोरील कॉंक्रिटीकरण रस्त्याचे काम सामाजिक कार्यकर्ते परशुराम चालवाडी व नीलिमा चलवाडी यांनी स्वखर्चातून केले.
दरम्यान तो रस्ता खराब झाल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे नागरिकांची समस्या समजून श्री चलवाडी यांनी स्वखर्चातून या रस्त्याचे काम पूर्ण केले त्यांच्या या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचा सत्कार केला.
यावेळी सुप्रिता धारणकर, निफा बुराण,अशीणा शेख, नाझिया बुराण, समीर बेग, फेहम मुल्ला, सीमा बुराण, इमरान शेख, इर्शाद,नदीम आदी उपस्थित होते.
