वेताळ प्रतिष्ठानतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन…

⚡वेंगुर्ला ता.२०-: वेताळ प्रतिष्ठानतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. रामेश्वर मंदिर तुळस येथे बालवाडी आणि पहिली ते दुसरीसाठी रंगभरण स्पर्धा तर तिसरी ते चौथीसाठी ‘माझी बाहुली‘, पाचवी ते सातवीसाठी ‘पाण्याखालील जीवसृष्टी‘ व आठवी ते दहावीसाठी ‘गायचीचा गोठा‘ या विषयांवर चित्रकला स्पर्धा होणार आहे. रंगभरण स्पर्धेसाठी व चित्रकला तिसरी ते चौथी या गटासाठी तेल रंग किवा स्केच पेन आणि पाचवी ते दहावीपर्यंतच्या गटासाठी जलरंग वापरावेत. स्पर्धकांना आयोजकांकडून कागद पुरवण्यात येईल. स्पर्धकांनी शालेय ओळखपत्र घेऊन यावे. सर्व गटातील प्रथम तीन विजेत्यांना बक्षिसे, मेडक व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ दोघांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सागर सावंत(९१५८४५४५९५) यांच्याशी संफ साधावा.

  अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत ७ जानेवारी रोजी तुळस वेताळ मंदिर येथे सकाळी ६.३० वा. खुला पुरुष व महिला, इ.१ली ते २री, इ.३री ते ४थी, इ.५वी ते ६वी, इ.७वी ते ८वी , इ.९वी ते १०वी प्रत्येकी मुली व मुलगे अशा  एकूण १२ गटासाठी जिल्हास्तरीय नव्या भविष्यासाठी भरड धान्य दौड स्पर्धा होणार आहे. दैनंदिन आहारामध्ये भरड धान्याचा वापर होणे आवश्यक आहे. या धान्याच्या प्रचार प्रसिध्दीसाठी या दौड स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथत तीन विजेत्यांना खुल्या पुरूष गटासाठी अनुक्रमे १५७५, १०७५, ७७५ तर खुल्या महिला गटासाठी ६६६, ४४४, ३३३ तर उर्वरित सर्व गटातील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. शालेय स्पर्धकांनी ओळखपत्र किवा शिफारस पत्र आणावे. नावनोंदणीसाठी  महेश राऊळ (९४०५९३३९१२) व प्रदिप परूळकर (९५५२४३६४७७) संफ करावा.

  १४ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वा. श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व व पाठांतर स्पर्धा होणार आहे. इयत्ता सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मोबाईल हटवा, बालपण वाचवा‘ यावर ५ ते ६ मिनिटे तर ८वी ते १०वीसाठी ‘कल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज‘ यावर ६ ते ७ मिनिटे

विचार मांडायचे आहे. इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी (इ.दहावीपर्यंत) ‘दी ग्रेट लिडर शिवाजी छत्रपती महाराज‘ यावर इंग्रजी भाषेतून ६ ते ७ मिनिटे वेळेत विचार व्यक्त करायचे आहेत. पाठांतर स्पर्धेमध्ये दुसरीपर्यंतच्या गटासाठी संस्कृत गणपती स्तोत्र तर तिसरी व चौथी गटासाठी मारुती स्तोत्र हे विषय ठेवण्यात आले आहे. यातील पाच विजेत्यांना भेटवस्तू, मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. शालेय लहान गटासाठी अनुक्रमे ५५५, ४४४, ३३३ उत्तेजनार्थ दोघांसाठी चषक व प्रमाणपत्र, शालेय मोठ्या गटासाठी अनुक्रमे ७७७, ५५५, ३३३, उत्तेजनार्थ दोन यांना चषक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

  सर्व स्पर्धकांनी शाळेचे शिफारस पत्र  किवा चालू शैक्षणिक वर्षाचे शालेय ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. नावनोंदणीसाठी गुरुदास तिरोडकर (९४२०७४७२६८) यांच्याशी संफ साधावा.
You cannot copy content of this page