मालवणात करवंटीपासून आकर्षक वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण…

⚡मालवण ता.०८-: मातृत्व वरदान फाऊंडेशन व कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे नारळाच्या करवंटीपासून उपयुक्त आकर्षक वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दि. १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत येथील हॉटेल श्री महाराज येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित केले आहे. प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे.

कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघ व मातृत्व वरदान फाऊंडेशन ही संस्था जिल्ह्यातील पर्यटन व व्यावसायिक वाढीसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करून स्थानिक भागात रोजगार निर्मितीसाठी कार्य करत आहे. आपल्या भागात नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने तेवढ्याच मोठ्या प्रमाणात करवंट्या उपलब्ध होतात. त्या विशेष करून जाळण्यासाठी वापरल्या जातात. त्याऐवजी त्यापासून उपयुक्त आकर्षक वस्तू निर्माण करणे शक्य आहे. या वस्तूंना मोठी मागणीही आहे. त्यामुळे अर्थार्जन होईल व करवंटी ज्वलनाने होणारे प्रदूषणही टळेल, हाच प्रशिक्षणाचा उद्देश आहे. यात सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट, महिला अशा कलाकुसरीच्या कामात आवड असणाऱ्या कलाकारांना संधी उपलब्ध होणार आहे. आयोजनाचा प्रदीर्घ अनुभव असलेली जिल्ह्यातील नामांकित संस्था, या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ प्रशिक्षक प्रत्येकाला प्रात्यक्षिक करण्याची संधी, प्रात्यक्षिक साहित्य पुरवठा, संस्थेद्वारा लेखन साहित्य पुरवठा, भोजन व्यवस्था, प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page