मडुऱ्यात दोन कोटींचा बंधारा होणार

शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर
करण्याच्या सूचना : लघु पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी..

⚡बांदा ता.०३-: मडुरा नदीवर लघुपाटबंधारे विभागाचा सुमारे ७० वर्षांपूर्वीचा बंधारा पूर्णपणे जीर्ण झाला आहे. त्यामुळे मडुरा – सातोसे सीमेवरील नदीपात्रात लघुपाटबंधारे विभागाचा सुमारे दोन कोटी रुपये खर्चून कोल्हापुरी पद्धतीचा सिमेंट बंधारा होणार आहे. लपाचे उपविभागीय जल संधारण अधिकारी आर. टी. धोत्रे यांनी नुकतीच बंधारा स्थळाची पाहणी केली. त्यांनी राज्य शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. सदर बंधारा अस्तित्वास आल्यास मडुरा, कास गावांसह सातोसे  गावांचा पाणीटंचाई प्रश्न संपुष्टात येणार आहे.
मडुरा नदीपात्रात बंधारा स्थळाची पाहणी लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी आर. टी. धोत्रे, टी. पी. यादव, सरपंच उदय चिंदरकर, बाळू गावडे, ज्ञानेश परब, बाबली परब आदीनी केली.

You cannot copy content of this page