⚡वेंगुर्ले ता.३१-: 26 ऑक्टोबर रोजी कसाल हायस्कूल मध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थांसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेत पारंपारिक गायन स्पर्धेत अणसूर पाल हायस्कूलचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी कु. मंदार बापू नाईक याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
अणसूर पाल हायस्कूलच्या मंदार नाईक या विद्यार्थ्यांचे अभिनंदनीय यश…
