घरालगत असलेल्या मांगरात बिबट्याने सहा महिन्यांच्या वासरावर हल्ला करून केला ठार…

न्हावेली येथील घटना:शेतकऱ्याचे पाच हजार रुपयांचे नुकसान..

बांदा/प्रतिनिधी
न्हावेली नागझरवाडी येथील शेतकरी सुनील लक्ष्मण परब यांच्या घरालगत असलेल्या मांगरात बिबट्याने सहा महिन्यांच्या वासरावर हल्ला करून ठार केल्याने शेतकऱ्याचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.


घटनास्थळी येत वनविभागाचे कर्मचारी श्री पडते, डॉ. विद्यानंद देसाई, सरपंच अष्टविनायक धाऊसकर, पोलिस पाटील चतुर मालवणकर यांनी पंचनामा केला. हज घटना आज पहाटे ५ वाजता घडली.

You cannot copy content of this page