मालवण तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्षपदी मनीषा गोसावी…

⚡मालवण ता.०७-:
मालवण महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा मालवणच्या अध्यक्षपदी मनीषा गोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तसेच उपाध्यक्षपदी कृष्णाजी दळवी, महिला उपाध्यक्षा माधुरी कामतेकर, सचिव भगवान जाधव, सहसचिव विनोद रावले, कोषाध्यक्ष पद्माकर कासले, प्रसिद्धीप्रमुख महेंद्र मोरे, कायदेशीर सल्लागार युवराज चव्हाण, महिला संघटक रश्मी सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवृत्त ग्रामविकास अधिकारी अशोक ओटवणेकर यांनी काम पाहिले. यावेळी निवडण्यात आलेल्या नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page