⚡मालवण ता.०७-: मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ – कातवड जोईवाडी येथील श्री देवी नवदुर्गा मंदिरात नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता घटस्थापना होणार आहे.
नऊ दिवस रोज सायंकाळी ७ वाजता पोथीवाचन, आरती, भजन व गरबा नृत्य होणार आहे. तसेच दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. होमहवन होणार आहे. तरी भाविकांनी उत्सवात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन नवदुर्गा व्यवस्थापकांतर्फे करण्यात आले आहे.
