⚡मालवण ता.०६-:
अखिल देवबाग विकास मंडळ, मुंबई संचलित देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कुलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मालवण तालुकास्तरीय शालेय निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा प्रशालेच्या १९९९, १९९२ व २००३ सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुरस्कृत केल्या आहेत. तिन्ही स्पर्धा देवबाग हायस्कुल मध्ये होणार आहेत.
तालुकास्तरीय शालेय निबंध स्पर्धा दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या तीन गटात होणार आहे. यात पहिली ते चौथीया पहिल्या गटाची स्पर्धा केवळ देवबाग केंद्र स्तरीय जिल्हा परिषद शाळांमधील मुलांसाठी होणार आहे. पहिल्या गटासाठी माझे वडील, आमचे वनभोजन, माझ्या गावची जत्रा, दुसऱ्या गटासाठी माझ्या सप्नातील शाळा, देवबाग एक निसर्गरम्य पर्यटन ठिकाण, मोबाईल शाप की वरदान, तिसऱ्या गटासाठी चांद्रयान ३ भारताची एक यशस्वी मोहीम, वाचन संस्कृतीची गरज, छत्रपती शिवाजी महाराज एक जाणता राजा असे विषय देण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी १२ ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे.
वक्तृत्व स्पर्धा दि. १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या तीन गटात होणार आहे. यात पहिली ते चौथी या पहिल्या गटाची स्पर्धा केवळ देवबाग केंद्र स्तरीय जिल्हा परिषद शाळांमधील मुलांसाठी सकाळी ११ वा. होणार आहे. तर इतर दोन गटाची स्पर्धा दुपारी २ वाजता होणार आहे. पहिल्या गटासाठी माझा आवडता ऋतू, शिवरायांचे बालपण, माझी आई, आवडता संत, दुसऱ्या गटासाठी माझे आवडते पर्यटन स्थळ, मी सैनिक झालो तर, स्वच्छ सुंदर परिसर, मला पडलेले सुंदर स्वप्न, तिसऱ्या गटासाठी मोबाईल खेळ घातक व्यसन, प्लास्टिक बंदी करण्याची गरज, स्त्री पुरुष समानता, सावरकर आणि अंदमान असे विषय देण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी नावनोंदणी १० ऑक्टोबर पर्यंत करावयाची आहे.
चित्रकला स्पर्धा दि. १० रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या तीन गटात होणार आहे. यात पहिली ते चौथी या पहिल्या गटाची स्पर्धा केवळ देवबाग केंद्रस्तरीय जिल्हा परिषद शाळांमधील मुलांसाठी होईल. पहिल्या गटासाठी माझे घर, माझ्या गावातील मंदिर, मला आवडणारा पक्षी, दुसऱ्या गटासाठी माझा सिंधुदुर्ग किल्ला, आम्ही साजरा केलेला गणेशोत्सव, वृक्षारोपण करताना मुले, शिक्षक व ग्रामस्थ, तिसऱ्या गटासाठी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३, भारतीय सण, चांद्रयान २०२३ असे विषय देण्यात आले आहेत.
या तिन्ही स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके, चषक व प्रमाणपत्र देऊन जानेवारी २०२४ मध्ये देवबाग हायस्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात गौरविण्यात येणार आहे. अधिक माहिती व नोंदणी साठी उदय चोडणेकर – ९४२२०७९०६६, विवेक गोसावी – ९४२११४४५६४, रवींद्रकुमार घेवडे- ९९२३५६९५९८, वसंत मेस्त्री – ९४०५७८७४८८, लक्ष्मण बांगारे – ८८०६२६५५८४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
