⚡सावंतवाडी ता.२५‐: रोजच्याप्रमाणे पहाटे पाणी भरण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना मळगाव कुंभारआळी येथे घडली. नागेश महादेव राऊळ ( ६३ ) असे त्यांचे नाव असून याबाबतची खबर त्यांच्या नातेवाईक प्रमोद गावडे रा. कोनापाल यांनी सावंतवाडी पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनाम्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
कुंभारआळीत वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू
