मनसेतर्फे मालवणात १ रोजी आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रम

⚡मालवण ता.२२-: मनसेचे नेते आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वतीने आरोग्य धनसंपदा या हसत खेळत घरगुती उपचाराचे मोफत मार्गदर्शन दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वा. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात करण्यात आले आहे. यावेळी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते निसर्गोपचार तज्ज्ञ व व्याख्याते स्वागत तोडकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

या आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनसेचे माजी मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे मालवण तालुकाध्यक्ष संदीप लाड, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक कुबल, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, मनविसे महिला तालुकाध्यक्ष सौ. प्राजक्ता पार्टे, माजी सचिव विल्सन गिरकर, माजी महिला तालुकाध्यक्ष सौ. भारती वाघ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page