‘त्या’ अनधिकृत बांधकाम विरोधात नगरसेवक गणेश भोगटे यांचे उपोषण

*💫कुडाळ दि.०८-:* केळबाई वाडीतील ओहोळात करण्यात अतिक्रमण हटवण्यात यावे यासाठी कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक गणेश भोगटे यांनी नगरपंचायत समोर उपोषण सुरू केले आहे. तेथील एका डेवलपर्सने ओहोळात अतिक्रमण केल्याने ओहोळ अरुंद झाला असून, त्यामुळे नजीकच्या घरांना पुराचा धोका निर्माण होतो. याची पाहणी देखील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी केली होती. तसेच अतिक्रमण काढून टाकण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजूनही सत्ताधारी व नगरपंचायत प्रशासन ही कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने नगरसेवक गणेश भोगटे यांनी उपोषण सुरू केले आहे.

You cannot copy content of this page