विविध विकास कामांना चालना देण्यासाठी आपल्याला साथ द्या…

माजी खासदार निलेश राणे यांचे प्रतिपादन;आंबडोस येथे सरपंच, उपसरपंच ग्राप सदस्यांसह ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश

⚡मालवण ता.१०-: गेल्या नऊ वर्षात मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघातील अनेक विकास कामे प्रलंबित राहिली आहेत. गावागावातील विकास कामांसाठी जिल्हा नियोजनमध्ये अपेक्षित निधी प्राप्त झाला नव्हता आता गेल्या वर्ष- दीड वर्षात तो होतोय. विधानसभेत मालवण कुडाळ मतदार संघाचा कधी उल्लेख होत नाही त्यामुळे मालवण कुडाळ मतदार संघाच्या विविध विकास कामांना चालना देण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असून या मतदार संघाच्या विकासासाठीच आपला संघर्ष सुरु आहे. राज्यातील पाहिल्या पाच विधानसभा मतदार संघात मालवण कुडाळचे नाव कसे येईल यासाठी प्रयत्नशील असून यात सर्वांची साथ गरजेची आहे, असे रोखठोक प्रतिपादन भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी येथे बोलताना केले.

मालवण तालुक्यातील आंबडोस गावच्या सरपंच सुबोधिनी परब, उपसरपंच रामदास नाईक तसेच माजी सरपंच राधा वरवडेकर, ग्रा. प. सदस्य प्रवीण मराळ, सतीश दळवी, श्रद्धा नाईक, अदिती परब, सुलभा यांच्यासह कदमवाडी आणि व्हाळवाडीतील ग्रामस्थांनी भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबडोस येथील श्री देव रवळनाथ मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी माजी खासदार निलेश राणे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दत्ता सामंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सरपंच सौ. सुबोधिनी परब, माजी सभापती अनिल कांदळकर, छोटू ठाकूर, माजी नगरसेवक दिपक पाटकर, राजू प्रभुदेसाई, धोंडी नाईक, विष्णू परब, प्रशांत नाईक, आबाजी पालकर, राजू कदम, अनंत कदम चौके माजी सरपंच राजा गावडे आदी व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सरपंच सौ. सुबोधिनी परब यांच्या हस्ते निलेश राणे व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले, नऊ वर्षांपूर्वी जिल्हा नियोजनचे बजेट हे किती होते आणि आता किती आहे याचा विचार करायला हवा नारायण राणे यांच्या प्रभावामुळे आणि प्रयत्नामुळे नियोजन मध्ये निधी येत होता अलीकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे जिल्हा नियोजनमध्ये भरीव निधी येत आहे असे असले तरी सहाशे ते सातशे कोटी निधीची आवश्यकता असताना या निधीसाठी कधी मागणी झाली नाही, ती मागणी आपण केली आहे असे सांगून ते म्हणाले,जिथे लोकांच्या जीवाचा प्रश्न असतो तिथे नियम बाजूला ठेवून विकासकामे करणे गरजेचे आहे असेही निलेश राणे म्हणाले. आमडोस गावातील जी कामे प्रलंबित राहिली आहेत, जी कामे मागणी करूनही झाली नाहीत, त्याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी आपण चर्चा करून ती सर्व आपण मंजूर करून देऊ, असेही निलेश राणे म्हणाले.

दत्ता सामंत, सुदेश आचरेकर यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी आंबडोस गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page