मालवण येथे ९ रोजी सायबर क्राईम शिबीर

⚡मालवण ता.०७-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे सायबर क्राईम मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात १८०० हून अधिक व्याख्याने व स्तंभलेखक व टीव्ही कार्यक्रमातून मार्गदर्शन करणारे चंद्रशेखर ठाकुर हे मार्गदर्शन करणार आहेत. जगभरातील इंटरनेट सेवेमुळे जनतेची फसवणूक करणारे मेसेज, बनावट कॉल, ई-मेल, ऑनलाईन आर्थिक व्यवहारातील फसवणूक, एटीएम व डेबिट कार्डद्वारे होणारी फसवणूक यापासून स्वतःला सुरक्षि राखण्यासाठी ठाकुर मार्गदर्शन करणार आहेत. आपली आर्थिक फसवणूक होऊ नये, याची दक्षता घेण्यासाठी नवतरुण, तरुणी, ज्येष्ठ, महिला व सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे

You cannot copy content of this page