*जॉईन कॉग्रेस ( गांधी दुत) अभियानाचा माध्यमातून काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवु

*सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष केतन गावडे यांची माहिती

*💫सावंतवाडी दि०६-:* कॉंग्रेस पक्षाने संपूर्ण देशभरात जॉईन कॉग्रेस अभियान ( गांधी दुत) सुरू केले आहे. जिल्ह्यात देखील हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष केतन गावडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. देशातील लोकशाही, संविधान, बेरोजगारी हे प्रश्न सोडवण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. कॉंग्रेसची विचारधारा सर्व लोकांपर्यत पोहचवण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. तसेच मोदी सरकार कॉंग्रेस पक्षाचा करत असलेला अपप्रचार मोडून काढण्यासाठी सोशल मीडिया वॉरियर निर्माण करण्यात येणार आहे. अशी माहिती काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष केतन गावडे यांनी दिली आहे. यावेळी माजी नगरसेवक राजू मसुरकर, तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, शहरध्यक्ष राघु नार्वेकर, सोशल मीडिया प्रदेश सचिव गौरी तेली, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष जास्मिन लक्ष्मेश्र्वर, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page