⚡ओरोस ता.३१-: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कसाल डोकलमवाडी येथे उलट्या दिशेने दुचाकी घेवून जाणाऱ्या युवकाने तेथील कठड्याला धडक दिली. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर लहू कुंभारकर वय १९ (रा. हडकरवाडी, ता. अचनी, जिल्हा बेळगाव) असे अपघाती मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाही सुरू आहे.
कसाल येथील अपघातात बेळगाव मधील तरुणाचा मृत्यू
