वैभववाडी प्रतिनिधी
कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कासार्डे येथे दि. 19 व 20 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद भरती व तलाठी भरती बाबत विनामुल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून करिअर मेकर्स अकॅडमी मुंबईचे संचालक प्रा. संजय मोरे हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचा जिल्ह्यातील पदवीधर युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासना मार्फत जिल्हा परिषद व तलाठी भरती जाहीर झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या 334 जागांसाठी सरळसेवा भरती जाहीर झाली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात 143 पदांसाठी ही भरती होणार आहे. अनेक वर्षापासून नोकरीच्या शोधात असणा-या उमेदवारांसाठी ही भरती आशेचा किरण ठरणार आहे.
या कार्यशाळेत अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व सामान्य ज्ञान याविषयी विनामुल्य सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवार व रविवार रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 या वेळेत होणार आहे. कासार्डे येथील अभिषेक मंगल कार्यालय, कासार्डे तिठा या ठिकाणी ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. जिल्ह्यातील युवक युवतींसाठि आमदार नितेश राणे यांनी संधी उपलब्ध करुन दिली आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी रोहित महाडिक 7066931053 यांच्याशी संपर्क साधावा.
