कुणकवळे गावातील विकासकामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

⚡मालवण ता.१७-: कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुणकवळे दुर्गादेवी मंदिर परिसर सुशोभीकरण करणे याकामासाठी १० लाख रु व कुणकवळे दुर्गादेवी मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामासाठी ५ लाख रु. चा निधी मंजूर केला आहे. आज या कामांची भूमिपूजने आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी आम नाईक यांनी कुणकवळे गावातील उर्वरित विकास कामांसाठी निधी मंजूर करण्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,उपतालुका प्रमुख बाळ महाभोज, कृष्णा पाटकर, हरी घाडीगावकर, शाखाप्रमुख विकास दळवी,उपसरपंच सुरेश राणे, देवयानी मसुरकर, चंद्रकांत पोळ, बाळा मसुरकर,आनंद वराडकर, प्रकाश पवार,श्रेया दळवी, राजू नाईक, सुरेंद्र गावडे, प्रकाश पोळ, प्रमोद राणे,रवींद्र सावंत, दिगंबर सावंत, मधुकर कुणकवळेकर, मोहन चुडनाईक, भास्कर पवार, सुनील नाईक, भाई सावंत, देवदास कदम आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page