उद्योजक गणेश सुर्वे यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

⚡कणकवली ता.१७-: मालवण तालुक्यातील
गोठणे गावचे सुपुत्र मुंबईचे
उद्योजक गणेश सुर्वे यांच्यावतीने गोठणे पंचक्रोशीतील शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गोठणे, सांडवे, खुडी, रामगड, निरोम या गावातील सर्व मराठी शाळा, अंगणवाडीच्या मुलांना दप्तर, ड्रेस, बूट, छत्री आणि खाऊ गेली पंधरा वर्षे स्वतः प्रत्यक्ष हजर राहून उद्योजक गणेश सुर्वे वाटप करत असतात. या गावातील विद्यार्थी चांगल्या मार्कांनी स्पर्धा परीक्षा, शालांत परीक्षेत यश संपादन करावे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्या कार्यक्रमाप्रसंगी गोठणे सरपंच सौ दीप्ती हाटले, उपसरपंच बाबू परब, शशिकांत परब आणि गावातील भाजपचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी गोठणे कोंड शाळा आणि महापुरुष क्रीडा मंडळ गोठणेच्यावतीने उद्योजक गणेश सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी गोठणे माजी उपसरपंच घनश्याम चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत गोठणे कंपाउंड वॉलचे भूमिपूजन उद्योजक गणेश सुर्वे,सोबत सरपंच सौ.दीप्ती हाटले, उपसरपंच बाबू परब आणि ग्रामस्थ.
यांच्या उपस्थितीत करण्यात आले

You cannot copy content of this page