⚡कणकवली ता.२४-: आदर्श शिक्षिका आणि समाजसेविका मायादेवी विश्राम रावराणे यांचा २१ वा स्मृतीदिन असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात सामाजिक बांधिलकीतून नुुकताच संपन्न झाला.
यावेळी कै.मायादेवी रावराणे यांचे सुपुत्र आणि चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र रावराणे, ॲड.अजित भणगे, निवृत्त गटशिक्षणाधिकारी मोहनराव सावंत, रोटरी क्लब ऑफ कणकवलीचे अध्यक्ष रो.शंकर तथा रवि परब, रो.डाॅ.विद्याधर तायशेटे, डाॅ.प्रदीप साटम, डाॅ.विक्रांत रावराणे, राजश्री रावराणे, संजय कदम, प्रा.जगदीश राणे, दिविजा वृद्धाश्रमचे व्यवस्थापक संदेश शेटये, आदी मान्यवर उपस्थित होते.स्मृतिपीठावरील
सर्व मान्यवरांनी कै. मायादेवी रावराणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मायादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र रावराणे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की,आईवडिलांचे प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण स्थान असते.आई आपला महान गुरू असते. तिने दिलेल्या ज्ञानसंस्काराची प्रेरणा घेऊन आम्ही तिच्या नावाने सुरु केलेल्या मायादेवी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक बांधिलकीतून समाजसेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत. आजचा हा स्मृतीदिन दिविजा वृद्धाश्रमातील अनाथांच्या सानिध्यात संपन्न व्हावा, ही आम्हा रावराणे कुटुंबियांची इच्छा होती. यावेळी मायादेवी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दिविजा वृद्धाश्रमातील व्यक्तींना धान्यादी व जीवनावश्यक वस्तूंचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच निवासी वृद्धांना मायादेवी ट्रस्ट तर्फे नवीन कपडे व भेट वस्तूंचे वाटपही करण्यात आले.वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक संदेश शेटये आणि सहकारीवृंद यांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील ॲड. अजित भणगे म्हणाले की, मायादेवी चॅरिटेबल ट्रस्टने सामाजिक कृतज्ञता जपत अनाथांच्या थकलेल्या जीवनात नवी उभारी आणण्यासाठी उचललेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. आपल्या आईच्या नावाने सुरू केलेल्या या ट्रस्टचे सामाजिक, शैक्षणिक कार्य येणाऱ्या नव्या पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणादायक आहे.तसेच श्री.मोहनराव सावंत यांनीही अशा स्तुत्य उपक्रमाला सदिच्छा दिल्या . यावेळी रोटरी क्लब ऑफ कणकवली अध्यक्ष शंकर तथा रवि परब, डॉ. विद्याधर तायशेटे, डाॅ. विक्रांत रावराणे, डाॅ.प्रदीप साटम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सेवानिवृत्त ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्याचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला, यामध्ये निवृत्त गटविकास अधिकारी आर.जी.सावंत (शिरगाव),निवृत्त ग्रामविकास अधिकारी रविकांत साटम (शिरगाव),निवृत्त जिल्हा वन अधिकारी संजय कदम, निवृत्त शिक्षिका वासंती भावे, निवृत्त ग्रामसेवक जनार्दन शिंदे आदी सत्कारमूर्तीं उपस्थित होते. या दिनानिमित्त रोटरी सदस्य रो.प्रमोद लिमये यांनी स्व देह ओळख आणि देहदानाविषयी उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी मायादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य, रावराणे कुटुंबिय तसेच रोटरी सेक्रेटरी जगदीश राणे,रोटरी सदस्य दादा कुडतरकर, उमा परब, ॲड.दिपक अंधारी,मेघा गांगण, अनिल कर्पे ,अंकिता कर्पे, लवू पिळणकर, रमेश मालवीय, सोनू मालवीय, राजस परब ,रंजन तांबे, नेहा तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचा परिचय जगदीश राणे यांनी करून दिला, संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन राजेश कदम यांनी केले तर आभार राजश्री रावराणे यांनी मानले.