आडेली हायस्कूलमध्ये अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून वह्या वाटप…

⚡वेंगुर्ला ता.१५-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे-परब यांच्यातर्फे आडेली येथील कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूलमध्ये वह्या वितरण कार्यक्रम १३ जुलै रोजी संपन्न झाला.

यावेळी माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष राजेश सामंत, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष बाबा टेमकर, राष्ट्रवादीचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, शालेय समिती अध्यक्ष सुरेश धुरी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक चव्हाण, सूत्रसंचालन माळी तर आभार पवार यांनी मानले.  

फोटोओळी – वह्या वितरणप्रसंगी अर्चना घारे-परब यांनी मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page