शरद पवार हेच आमचे दैवत

अर्चना घारे परब: सत्तेसाठी लाचार होणार नाही…

सावंतवाडी ता.०४-: शरद पवार साहेब हेच आमचे दैवत असून त्यांच्यामुळे आपण समाजकारण राजकारण शिकले त्यामुळे यापुढे राजकारणात काही मिळो अगर न मिळो मी शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहिन सत्तेमुळे काही मिळेल म्हणून मी कुठेही जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका अर्चना घारे परब आज येथे मांडली.

दरम्यान अजित पवार यांचेही माझ्या राजकीय जडणघडणीत मोठे योगदान आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्यासाठी एक कुटुंब असून शरद पवारांचे आजचे वय पाहता त्यांना सोडून आम्ही कुठेही जाणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सौ.घारे परब म्हणाल्या, शरद पवार हेच आमचे दैवत आहेत राजकारण आणि समाजकारण काय असते हे आम्ही त्यांच्याचमुळे शकलो मात्र आज राजकारणामध्ये तत्व आणि निष्ठेला थारा नसल्याने आज राजकारण वेगळ्याच दिशेला चालले आहे राष्ट्रवादीत घडलेल्या घडामोडीचा विचार करता शरद पवार यांचे आजचे वय पाहता ती वर्ष त्यांच्यासोबत काम करून राष्ट्रवादी पक्ष हा आपला कुटुंब म्हणून वावरताना त्यांना सोडून दुसरीकडे जाणे मनाला पटत नाही त्यामुळे त्यांच्यासोबत राहून मला राजकारणात काहीही नाही मिळाले तरी चालेल परंतु काही मिळेल या आशेने आपण कोणासोबत कधीच सत्तेत जाणार नाही. आपल्याला राष्ट्रवादी सोडायची असती तर मागच्या विधानसभा निवडणुकी वेळी उमेदवारी तिकीट नाही मिळालं म्हणून सोडली असती परंतु आपण तत्व आणि निष्ठा मानून राष्ट्रवादीमध्ये आतापर्यंत काम केले आणि यापुढेही करणार. कुठलेही धर्माचे राजकारण न करता सर्वधर्मसमभाव म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो त्यामुळे जातीय तीळ निर्माण करणाऱ्या पक्षाशी आपण कधीही मिलाफ होणार नाही. त्यामुळे उद्या होणाऱ्या शरद पवार यांच्या मुंबईच्या बैठकीला सिंधुदुर्गातील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

सौ.घारे परब पुढे तसेच म्हणाल्या शरद पवारांचे कोकणावर अतूट प्रेम आहे महाराष्ट्र दौरा करताना ते येणाऱ्या काळात कोकणात नक्कीच येतील. त्यांची विचारसरणी मानूनच यापुढे आम्ही काम करणार आहोत. राज्यातील घडामोडी नंतर आपल्याला खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता मात्र अन्य कोणाचाही आपल्याला अद्यापही फोन आलेला नाही मुळात आपला कुठलाही काळा धंदा नाही त्यामुळे आपल्याला कोणाच्या संरक्षणाची ही गरज नाही त्यामुळे कोणी कितीही फोन केले तरी आपण शरद पवार यांच्या सोबतच असणार आणि यापुढेही राहू.

चौकट


अजित पवारांचा आदर कायम..


माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये अजित पवार यांचे योगदान फार मोठे आहेत त्यामुळे त्यांचा आदर कायमच असणार परंतु आज ते सत्तेत गेल्याने तत्व आणि निष्ठा सोडून त्यांच्याकडे कुठलेही प्रकारचे विकासकाम किंवा मदत आपण मागणार नाही असेही सौ घारे परब यांनी बोलताना सांगितले.

यावेळी त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, हिदायतुल्ला खान, राकेश नेवगी, ॲड.सायली दुभाषी,चित्रा देसाई, सावली पाटकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page