तहसिलदारपदी नव्याने हजर झालेले श्रीधर पाटील यांचे शिंदे शिवसेनेच्या वतीने स्वागत

⚡सावंतवाडी ता.२३-: येथील तहसिलदारपदी नव्याने हजर झालेले श्रीधर पाटील यांचे शिंदे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. गेली सात महीने प्रभारी तहसिलदार म्हणून श्री उंडे काम पाहत होते. मात्र कायमस्वरुपी तहसिलदार कार्यरत असावे अशी शिंदे शिवसेनेची होती.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी, महीला आघाडी जिल्हाप्रमुख अॅड, सौ. निता सावंत- कविटकर, सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, माजी नगराध्यक्ष श्रीम. अनारोजीन लोबो, शिवसेना शहर महीला आघाडी प्रमुख सौ. भारती मोरे, श्री. गजानन नाटेकर, विभागप्रमुख श्री. पप्पू सावंत, सौ. जयश्री ठाकूर, सौ. सायली होडावडेकर, श्री. शिवप्रसाद कोळंबेकर, श्री. एकनाथ हळदणकर, श्री. विश्वास घाग, श्री. पांडुरंग नाईक, आदी कार्यकर्ते उपस्थित होते…

You cannot copy content of this page