मकरंद तोरसकर: दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न..
⚡बांदा ता.२०-: आजचे गुणवंत विद्यार्थी हे उद्याचे या देशाचे भविष्य असून या विद्यार्थ्यांनी यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करून आपल्या जीवनात यशस्वी व्हावे असे कौतुकोदगार बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर यांनी येथे काढले.
येथील खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कुल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री. तोरसकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माधवी सावंत, पर्यवेक्षक एन जी नाईक, उच्च माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक पी. यू. देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात दहावीतील गुणवंत विद्यार्थी निशांत नाईक, कौस्तुभ सावंत, इशिता सावळ, इतिहास राज्यशास्त्र विषयात २ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविल्याबद्दल विषय शिक्षक सूर्यकांत सांगेलकर, संस्कृत विषयात ५ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविल्याबद्दल विषय शिक्षिका शामल सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
बारावी परीक्षेत विज्ञान विभागात प्रवण नाईक, अशोक मयेकर, श्रावणी देसाई, कला विभागात सुगंधा गावडे, तन्वी वझे, वैशाली राऊळ, वाणिज्य विभागात जतीन देसाई, शालिनी नाईक, पुजाकुमारी माळी, हॉर्टिकल्चर विभागात रितेश राणे, दत्ताराम बांदेकर, अकाउंटिंग अँड ऑडिटिंग विभागात शांताराम सावंत, गोविंद सावंत, अश्विनी घाडी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी विभागात सिद्धेश गवस, सचिन देसाई, आयुष दळवी या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विद्यार्थी व पालक यांनी मनोगत व्यक्त केलीत. तसेच शाळेचा निकाल १०० टक्के लागल्याबद्दल कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत सांगेलकर यांनी केले.