शिवसेना ठाकरे गटातर्फे शिवरायांना अभिवादन

⚡मालवण ता.०७-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण शाखेत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. तसेच छत्रपतींचा जयघोष करणाऱ्या घोषणाही देण्यात आल्या.

याप्रसंगी शहरप्रमुख बाबी जोगी, महिला तालुका संघटक दीपा शिंदे, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, यशवंत गावकर, महेंद्र म्हाडगूत, युवा उपशहरप्रमुख उमेश चव्हाण, युवतीसेना तालुका संघटक निनाक्षी शिंदे, शाखाप्रमुख बंड्या सरमळकर, शाखाप्रमुख नरेश हुले, विभागप्रमुख विजय पालव, युवासेना देवबाग विभागप्रमुख चंदू खोबरेकर, सिद्धू जाधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page