सिंधुदुर्गच्या विकासासाठी “सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन समिती” स्थापन करा…

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

⚡सावंतवाडी ता.०६-; गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास साधता यावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन समिती स्थापन करा येत्या सहा महिन्यात गोव्या एवढाच सुंदर सिंधुदुर्ग घडवू असा दावा स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केला.
तर पायलट प्रोजेक्ट म्हणून जलशुद्धीकरण प्रकल्पाला मान्यता देण्याबरोबरच आंबोलीचा पर्यटन विकास साधण्यासाठी पर्यटन विकास प्राधिकरणाची स्थापन करा अशी मागणीही केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांजवळ केली

You cannot copy content of this page