*💫मालवण दि.२४-:* मालवण मधील वीज समस्या सोडविण्यासाठी सुकळवाड ते मालवण वीज उपकेंद्रापर्यंत मिनी टॉवरद्वारे विद्युत पुरवठा व्हावा, अशी मागणी मालवण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. दरम्यान, मंत्री राऊत यांनी धुरी यांच्या निवेदनाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत वीज कंपनीचे सिंधुदुर्ग मंडलला सूचना दिली असल्याची माहिती मेघनाद धुरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे मालवणमध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे. मालवण शहर समुद्र किनारी असल्यामुळे थोडा जरी पाऊस झाला, तरी वीजपुरवठा खंडित होतो. मालवणमधून सुकळवाड टॉवरची लाईन गेलेली आहे. सुकळवाड ते मालवणच्या उपकेंद्रापर्यंत मिनी टॉवर लावून वीजपुरवठा केल्यास हा प्रश्न कायमचा सुटेल अशी मागणी मेघनाद धुरी यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याबाबत मंत्री राऊत यांनी सिंधुदुर्ग वीज मंडळाला योग्य ती कार्यवाही कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सुकळवाड ते मालवण वीज उपकेंद्रापर्यंत मिनी टॉवरद्वारे विद्युत पुरवठा व्हावा-: मेघनाद धुरी…
