रवी जाधव यांची पालिका प्रशासनास आर्त हाक
*💫सावंतवाडी दि.२४-:* मी शुशिक्षत बेरोजगार आहे मी कुठेही बसुन काम करू शकतो. त्यामुळे माझ्यावर पालिकेने केलेला अन्याय हा अन्यायकारक असून मी पोटटासाठी नाही तर न्यायासाठी लढतो, अशी आर्त विनंती कारवाईसाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना रवि जाधव यांनी केली आहे. तर वरिष्ठांनी आम्हाला दिलेल्या आदेशानुसार आम्ही कारवाईसाठी आलेलो आहोत स्वतःहून स्टॉल हटविण्याबाबत पालिकेकडून नोटीसही बजावण्यात आलेली होती त्यामुळे आम्ही आमचे काम करणार असे अतिक्रमण पथकाचे सुरज गजबाल याने सांगितले यावेळी जाधव कुटुंबीयांनी तीव्र विरोध दर्शवला अखेर 24 तासाची मुदत देत अतिक्रमण पथक माघारी फिरले.