अँड. परिमल नाईक; शहराच्या विकासासाठी वेळोवेळी भरीव निधी देण्याचा पालकमंत्र्यांचा अभिवचन…
⚡सावंतवाडी ता.०३-: शहरातील विविध विकास कामासाठी कार्यतत्पर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तातडीने निधी मंजूर दिला. त्यांनी हा मंजूर करून दिलेला निधी म्हणजे सावंतवाडी शहराच्या विकासाची नांदीच, असे मत माजी सभापती तथा नगरसेवक अँड. परिमल नाईक यांनी व्यक्त केल आहे.
नाईक यांनी म्हटले आहे की, सावंतवाडी नगरपरिषदेच्या नियोजित नळपाणी योजनेला तसेच मोती तलाव दुरुस्तीसाठी, अग्निशमक बंब व इमारत यासाठी पालकमंत्री यांनी भरीव निधी मंजूर करून दिला आहे तसेच सावंतवाडी शहराबरोबर जिल्ह्यातील विविध विकासकामांचा पालकमंत्री यांचा धडाका हा जिल्ह्यातील सकारात्मक गतिमान विकासाचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. सावंतवाडी शहराच्या विकासासाठी वेळोवेळी भरीव निधी देण्याच पालकमंत्र्यांचं अभिवचन त्यांनी वेळोवेळी पूर्ण केल आहे.
