पाणी, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या दिव्यांग पदयात्रेचे बांदा येथे स्वागत

भाजपने केला सन्मान:११ डिव्यांग मुंबई ते गोवा निघालेत पायी

बांदा/प्रतिनिधी
पाणी वापराचे महत्व, पावसाचे पाणी साठवणे तसेच पर्यावरण व वातावरणातील बदल याबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबईतील ११ दिव्यांग मुलांनी मुंबई ते गोवा अशी पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. काल सायंकाळी उशिरा या पदयात्राचे बांदा शहरात बांदा भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटून याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.
७ एप्रिल रोजी मुंबईतून बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन यांच्या वतीने दिव्यांग मुलांनी मुंबई ते गोवा अशा पदयात्रेला प्रारंभ केला. आजपर्यंत त्यांनी ६०० किलोमीटरहून अधिक अंतर पायी कापले आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा पदयात्रा बांद्यात दाखल झाली. बांदा भाजपच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर यांनी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी उपसरपंच जावेद खतीब, माजी सरपंच मंदार कल्याणकर ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, निरवडे ग्रामपंचायत सदस्य जयराम जाधव, शिक्षक जे डी पाटील, ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट, रेश्मा सावंत, श्रेया केसरकर, तनुजा वराडकर, भाजपा महिला शहर अध्यक्षा अवंती पंडित, संदीप बांदेकर, साईश केसरकर, अक्षय मयेकर आदी उपस्थित होते. यावेळी पदयात्रेत सहभागी झालेल्या युवकांची बांदा शहरात निवासाची व न्याहारीची सोय करण्यात आली. आज सकाळी पदयात्रा गोव्याला रवाना झाली.

You cannot copy content of this page