सावंतवाडीत डॉ आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

भीम गर्जना बौद्ध मंडळाचे आयोजन;
उद्या विविध स्पर्धांचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.१४-: भिमगर्जना बौद्ध मंडळ यांच्यामार्फत आज सावंतवाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आज दिनांक 14 व उद्या दिनांक 15 एप्रिल रोजी विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रात्री 9 वाजता जादूगर वैभव कुमार यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत. तर उद्या दिनांक 15 एप्रिल रोजी भीमगीतांवर व समाज प्रबोधनपर जुगलबंदीचा सामना शालिनी गवई विरुध्द अनिल शिरगावकर यांच्यात होणार आहे. याबाबतची माहिती मंडळाचे अध्यक्ष मंगेश कदम यांनी दिली आहे.

यावेळी सचिव प्रविण कांबळे, उपाध्यक्ष ललिता कांबळे, खजिनदार प्रशांत पाटणकर, तसेच सदस्य रुपेश जाधव, अमन अनावकर, दुर्गेश खोब्रागडे, सुरेश कांबळे, किरण कांबळे, हेमंत कांबळे, लतेश पवार, धोंडी अनावकर, जयवंत जाधव, शैलेश जाधव, अभिजीत जाधव, निवेद कांबळे, मानसी कदम, मीनाक्षी पवार, ज्योती जाधव, लक्ष्मी जाधव, जयश्री पाटणकर, वासू कदम, अनिकेत जाधव, निखिल कांबळे, लवलेश कांबळे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page