मागासवर्गीयांसाठी सावंतवाडीत समाज परिषद…

मंत्री दीपक केसरकर; व्यवसाय उद्योगांचे देणार प्रशिक्षण

⚡सावंतवाडी ता.१४-: मागास समाज बांधवांसाठी सावंतवाडीमध्ये येत्या पंधरा दिवसानंतर समाज परिषद घेऊन त्याद्वारे समाजातील बेरोजगारांना व्यवसाय उद्योगा चे प्रशिक्षण दिले जाणार असून या परिषदेत आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि सावंतवाडी चे सुपुत्र
नामदार दीपक केसरकर यानी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथे केली त्यांच्या हस्ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला
यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ते पुढे म्हणाले बाबासाहेबांना अपेक्षित व्यावसायिक शिक्षण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून राज्यात सुरू केले जात असून याद्वारे व्यवसायभिमुख शिक्षण दिले जाणार आहे त्याचबरोबर सावंतवाडी शहरातील ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून स्कील डेव्हलपमेंट यातून रोजगार निर्मिती व्हावी याकरिता जेष्ठ मार्गदर्शकांना बोलावून समाजातील रोजगार निर्मितीसाठी रोजगार मेळावा लवकरच उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या खात्यामार्फत हा मेळावा घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले तर मुंबईमध्ये स्किल डेव्हलपमेंट चे मोठे केंद्र उभे राहत असून बाबासाहेबांनी स्थापन केलेली बौद्धजन पंचायत समिती परिषद भवनासाठी 25 कोटी रुपये मुंबईचा पालक मंत्री म्हणून आपण दिल्याचे त्यांनी सांगितले येत्या सहा महिन्यात हे भवन पूर्ण होईल तेव्हा मोठा सोहळा आयोजित केला जाणार आहे तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली दोन कॉलेजची पूर्णत्वास नेऊन त्यांचे विचार भविष्यात कायम सुरू राहतील या दृष्टीने शासन प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले बाबासाहेबांनी समाजाला नवीन ऊर्जा दिली घटना दिलीच त्याचबरोबर प्रत्येक अंगाला न्याय मिळेल असा मंत्र दिला शिका संघर्ष करा संघटित व्हा असा मंत्र दिला ते उत्कृष्ट वकील उत्कृष्ट पत्रकार होते तर अर्थतज्ञ होते अशा शब्दात त्यांना अभिवादन त्यांनी केले
यावेळी सगुण जाधव कवी विठ्ठल जाधव माजी उपनगराध्यक्ष तानाजी वाडकर महिला व बालकल्याण माजी सभापती माधुरी वाडकर उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी गजानन नाटेकर मोहन जाधव गुंडू जाधव अनिल जाधव शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर भारती मोरे सुरेश सावंत आबा केसरकर प्रसन्न शिरोडकर आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page