डॉ.आंबेडकर यांना भाजपातर्फे अभिवादन

⚡वेंगुर्ला ता.१४-: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त भाजपा तालुका कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी जेष्ठ साहित्यिक अजित राऊळ यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, साईप्रसाद नाईक, साक्षी पेडणेकर, वृंदा गवंडळकर, रसीका मठकर, सुनील मठकर उपस्थित होते.
फोटोओळी – साहित्यिक अजित राऊळ यांनी आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

You cannot copy content of this page