कणकवली तालुका पत्रकार संघ अध्यक्षपदी अजित सावंत

उपाध्यक्षपदी अनिकेत उचले, दिगंबर वालावलकर तर सचिवपदी माणिक सावंत

⚡कणकवली ता.१३-: कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अजित सावंत यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या चूरशीच्या निवडणूकीत अजित सावंत हे 31 मते मिळवून विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी भगवान लोके यांना 29 मते मिळाली. पत्रकार संघाची अन्य कार्यकारीणी निवड बिनविरोध करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी अनिकेत उचले व दिगंबर वालावलकर, सचिवपदी माणिक सावंत तर खजिनदारपदी योगेश गोडवे यांची निवड झाली आहे.
तालुका पत्रकार संघ कार्यकारीणी निवडीची विशेष सभा गुरूवारी कणकवलीतील शासकीय विश्रामगृहावर झाली. निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा पत्रकार संघाच्या सचिव देवयानी वरसकर, उपाध्यक्ष बाळ खडपकर, कार्यकारीनी सदस्य प्रकाश काळे हे उपस्थितीत होते. या बैठकीला परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, जिल्हा प्रतिनिधी संतोष राऊळ, जेष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, तालुका पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, सचिव संजय राणे, खजिनदार नितीन कदम, अशोक करंबेळकर, भाई चव्हाण, भालचंद्र साटम आदींसह तालुका पत्रकार संघाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. निवडणूक निरीक्षक देवयानी वरसकर यांनी निवड पद्धतीची माहिती दिली व निवड बिनविरोध करण्याचे आवाहन केले. अध्यक्ष पदासाठी अजित सावंत, भगवान लोके व दिगंबर वालावलकर असे तीन सदस्य इच्छुक होते. यातील श्री. वालावलकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने श्री. सावंत व श्री. लोके यांच्यात थेट निवडणूक झाली. यासाठी उपस्थित 60 सदस्यांनी मतदान केले. पैकी अजित सावंत यांना 31 तर भगवान लोके यांना 29 मते मिळाली. त्यामुळे अजित सावंत हे अध्यक्षपदी विजयी झाल्याचे निवडणूक निरीक्षक देवयानी वरसकर व बाळ खडपकर यांनी जाहीर केले.
अन्य कार्यकारीनी निवड बिनविरोध करण्यात आली. यामध्ये सहसचिवपदी उत्तम सावंत, सदस्यपदी भास्कर रासम, अस्मिता गिडाळे, किशोर राणे, उमेश बुचडे व तुषार हजारे यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्यासह निवडणूक निरीक्षक, ज्येष्ठ पत्रकार आणि सर्व सदस्यांनी पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष अजित सावंत व कार्यकारीणीचे अभिनंदन केले. नूतन अध्यक्ष अजित सावंत यांनी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना सोबत घेवून ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करत कणकवली तालुका पत्रकार संघाचा नावलौकीक वृद्धीगंत करणार असल्याचे सांगितले. मावळते अध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांनी आपल्याला मिळालेल्या सहकार्याबद्दल कार्यकारीणी सदस्य व सभासदांचे आभार मानले.

You cannot copy content of this page