सरपंच प्रवीण पंडित : चौदा वित्त आयोग अंतर्गत उपकेंद्रास औषधे वाटप
⚡बांदा ता.१३-: कोरोना कालावधीत गावातील ग्रामस्थांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. भविष्यात कास गावचे आरोग्य जपण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे कास सरपंच प्रवीण पंडित यांनी सांगितले.
चौदा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत कास उपकेंद्रास सरपंच प्रवीण पंडित यांच्या उपस्थितीत विविध औषधे वाटप करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. उपसरपंच गजानन पंडित, ग्रा.पं. सदस्य रुक्मिणी पंडित, निकिता कासकर, श्रेया राणे, ग्रामसेवक विनय धाकोरकर, सीएचओ प्रतीक्षा गावित आदी उपस्थित होते.
