तहसीलदार श्रीधर पाटील यांचा उपक्रम;प्रगत विद्यामंदिर रामगड येथे आयोजन
मालवण (प्रतिनिधी)
मालवण तहसील कार्यालयाच्या वतीने महाराजस्व अभियान अंतर्गत ऑन दि स्पॉट दाखले शिबिरचे आयोजन प्रगत विद्यामंदिर रामगड येथे बुधवारी करण्यात आले. तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या शिबिरात १०२ ग्रामस्थांना दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल कर्मचारी यांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी केलेल्या मागणी मागणी अर्ज व आवश्यक कागदपत्रे पडताळणी करून तात्काळ उत्पन्न, वय अधिवास, रहिवासी, जेष्ठ नागरिक व अन्य दाखले वितरित करण्यात आले. यावेळी सरपंच शुभम मठकर व अन्य लोकप्रतिनिधी ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिर आयोजन बाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
