⚡सावंतवाडी ता.०४-: कळणे येथील संबंधित नुकसानग्रस्तांना न्याय देण्यात येईल, त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांनी दिल्यानंतर मनसेचे युवा कार्यकर्ते अभय देसाई व कळणे ग्रामस्थांनी पुकारलेले आक्रोश आंदोलन अखेर मागे घेण्यात आले.
याबाबत संबधित शेतकर्यांना न्याय मिळावा यासाठी मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी श्री. पाटील यांची ओरस येथे भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी झालेल्या चर्चेत आम्ही संबंधित शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू, त्या दृष्टीने पाठपुरावा करू, असे आश्वासन यावेळी अधिकारी पाटील यांनी दिले. त्यामुळे आक्रोश आंदोलनाचा इशारा मागे घेण्यात आला आहे.
यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, जिल्हा संघटक अमोल जंगले, उपजिल्हा संघटक अभय देसाई, कुणाल किनळेकर, विशाल ओटवणेकर, संदेश शेटये, संदिप लाड, आबा चिपकर, निलेश देसाई, नाना देसाई आदी उपस्थित होते.
