भाजपच्या राजन तेली यांनी कापले फित;शुभारंभ प्रसंगी ठेवलेल्या ऑफर्सचा ग्राहकांनी घेतला लाभ
सावंतवाडी,ता.३०-: सावंतवाडी शहरात नव्याने सुरू झालेल्या “पी. एस. चोडणकर” ज्वेलर्सचे आज माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. पी एस चोडणकर ज्वेलर्सला ७३ वर्षांची परंपरा आहे. या प्रसिद्ध चोडणकर ज्वेलर्सच्या माध्यमातून शहरातील तारा हाॅटेल समोरील दत्तात्रय निवास या कॉम्प्लेक्समध्ये हे दालन उभारण्यात आले असून यावेळी मोठ्या संख्येने ग्राहकांनी उपस्थित राहत उद्घाटनानिमित्त जाहीर केलेल्या खास ऑफरचा लाभ घेतला.
या उद्घाटन प्रसंगी दालनाचे प्रमुख पावन चोडणकर, श्रीपाद चोडणकर, विजय चोडणकर, मंगलदास चोडणकर, बाळ पुराणिक, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे शाखा मॅनेजर अर्जुन मालव, सिंधुदुर्ग व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, गुरु मठकर आदिंसह चोडणकर कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दालनात उद्घाटनाच्या निमित्ताने खरेदीसाठी येणार्या ग्राहकांना पन्नास हजार पर्यंतचे सोने खरेदी केल्यास पाच ग्रॅम, तर एक लाखापासून पुढे खरेदी केल्यास दहा ग्रॅम चांदीचे नाणे गिफ्ट दिले जात आहे. तसेच दागिने करणावळीवर तब्बल २० टक्केची सुट दिली जात आहे. या सर्व ऑफर्सचा उद्घाटना दिवशी ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.
