तळेरे ज्येष्ठ नागरिक संघाचा स्नेह मेळावा उत्साहात 

⚡कणकवली ता.३०-: तळेरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात तळेरे येथील श्रीधर सुर्वे यांच्या यांच्या बागेत झाले. यावेळी पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या सेवा संघाचा दरवर्षी स्नेह मेळावा उत्साहात होतो.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाकांत वरुणकर, तर प्रमुख पाहुणे निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी सुर्यकांत तळेकर होते. यावेळी संस्थापक सुरेश तळेकर, संघाचे सचिव दिलीप पाटिल, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, साळिस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर यांच्यासह संघाचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाकडून विविध ठिकाणी यश मिळविलेल्या तसेच, 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. 
तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच शैलेश सुर्वे, साळिस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, दारुम ग्रामपंचायत सदस्य शुभांगी कल्याणकर, प्रवीण अमृते, ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष वामन ताम्हणकर, संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर तसेच 75 वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक बबन कान्जीर, सिताराम गुरव, सरिता साळिस्तेकर, अनंत केसरकर यांना शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी वामन ताम्हणकर, सुर्यकांत तळेकर, रमाकांत वरुणकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तळेरे, साळिस्ते, ओझरम, कासार्डे, शिडवणे, दारुम येथील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक,  सुत्रसंचालन व आभार दिलीप पाटिल यांनी मानले. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी तळेरे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अरुण भांबूरे, सुरेश तळेकर, दिलीप मुद्राळे, मोहन खानविलकर, श्रीधर सुर्वे, चंद्रकांत तळेकर, नामदेव पाटिल यांच्यासह सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. 

You cannot copy content of this page