कांदळगावच्या रामेश्वर मंदिरात रामनवमी उत्सवाचे आयोजन

⚡मालवण ता.२१-: मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील श्री रामेश्वर मंदिरात श्री देव रामेश्वर देवस्थान परिसर देवालये विश्वस्थ मंडळ, कांदळगाव यांच्यावतीने बुधवारी २२ मार्च (गुढीपाडवा) पासून श्री रामनवमी उत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्यापासून ते गुरुवार दि. ३० मार्च रामनवमी पर्यंत श्री देव रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

बुधवार २२ मार्च २०२३ गुढीपाडवा या दिवसापासून नऊ दिवस रोज रात्रौ पुराणवाचन, पालखी प्रदक्षिणा व किर्तन होणार असून गुरुवार ३० मार्च रोजी रामनवमी निमित्त सकाळी ११ वा. किर्तन, दुपारी १२ वा. रामजन्म त्यानंतर पालखी प्रदक्षिणा, दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्रौ ९.३० वा. पुराण वाचन, पोथीपुजन, पालखी प्रदक्षिणा, मर्दानी खेळ किर्तन व त्यानंतर दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. शुक्रवार ३१ मार्च सकाळी ७.३० वा. लळीतोत्सवाने कार्यक्रमाची सागंता होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान मानकरी, देवस्थान विश्वस्थ आणि ग्रामस्थ, कांदळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page