झोपेत असताना सचिनचा खून केल्याचे झाले निष्पन्न
ओरोस ता.१५-:सचिन भोसले रविवारी रात्री घरात झोपलेले असताना त्यांचा सख्खा मोठा भाऊ वामन उर्फ संतोष श्रीकांत भोसले यांनी त्याच्या डोकीत पाठीमागून लोखंडी शिग खुपसली आणि या हल्ल्यात सचिनच्या मेंदूची कवटी फुटून ते जागीच गतप्राण झाले. या प्रकरणी सख्खा भाऊ वामन यांना अटक करण्यात आली आहे. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटना उघड झाल्यानंतर काही तासांत आरोपीला अटक करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर आणि सिंधुदुर्गनगरी पोलिसांना यश आले आहे.
