भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी फोडले नारळ
⚡सावंतवाडी ता.०४-: ७० लाखाच्या नळ योजनेसाठी माजगाव गावात एक कोटींच्या कामांचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते करण्यात आला.
हरसावंतवाडा जिल्हा परिषद शाळा नंबर ३ ते भोगणे घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण पाच लाख रुपये, गुलाबी तिठा ते सुभेदार रस्त्याला गटार बांधणे पाच लाख रुपये, गुलाबी तिठा ते सुभेदार रस्ता तयार करणे व रस्त्याला गटार बांधणे पाच लाख रुपये, कुंभारवाडा ते ख्रिश्चनवाडा रस्ता मजबुतीकरण करणे आणि गटार बांधणे १५ लाख रुपये अशा अन्य कामांची भूमिपूजने राजन तेली यांच्याहस्ते झाली.
यावेळी भाजपचे प्रवक्ते संजु परब , आनंद नेवगी , मनोज नाईक ,माजगांव सरपंच सौ.अर्चना सावंत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.रेश्मा सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, उपसरपंच बाळा वेजरे , रिचर्ड डिमेलो,सर्व ग्रा.पं.सदस्य, अजय सावंत,श्याम कासार, ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावी उपस्थित होते.
